बिबट्या असो वा नसो, रामनदीचं काम सुरूच राहणार. TOYOTA SHOWROOM OUTFALL ✅✅✅. IMP: मी जमीनमालकांचे मनापासून आभार मानतो, ज्यांनी PMC ला पूर्ण सहकार्य दिलं त्यांच्या सहकार्याशिवाय हे शक्यच नव्हतं #SustaimableDevelopment -- Regards Adv. Krunna;l Gharre Prabhag 10(D)
भूगाव, भुकुम, बावधन परिसरातील सर्व ग्रामस्थ व संबंधित रहिवाशांच्या वतीने हे पत्र आपणास सादर करण्यात येत आहे. रामनदीतील सांडपाणी विसर्ग रोखण्यासाठी आम्ही, नागरिक प्रतिनिधींनी, PMRDA सह प्रत्येक संबंधित प्राधिकरणाकडे सातत्याने, नम्रपणे आणि परिश्रमपूर्वक पाठपुरावा केला. दुर्दैवाने, प्रत्येक वेळी 'पाहू', 'करू' अशा संदिग्ध आश्वासनांशिवाय कोणतीही ठोस कृती झाली नाही. गंभीर बाब: मा. विभागीय आयुक्त (दि. ०४ एप्रिल २०२५) व मा. NGT (OA 52/2023) यांचे स्पष्ट निर्देश लागू असताना आणि आपल्या कार्यालयाकडून आदेश देऊनही , कामाची अंमलबजावणी झालेली नाही. फक्त ३० मीटरचे सीवर कनेक्शन आजतागायत अपूर्ण आहे. परिणामी, सुमारे ७०% सांडपाणी (१ MLD) थेट रामनदीत मिसळत आहे. PMRDA कडून झालेल्या अक्षम्य विलंबामुळे या गंभीर परिस्थितीत शांततापूर्ण आंदोलन करण्याशिवाय नागरिकांना पर्याय राहिलेला नाही. त्यानुसार, 'रामनदी सत्याग्रह — धरना आंदोलन' बाबत आपणास अधिकृत सूचना देण्यात येत आहे: 📅 दिनांक २८ नोव्हेंबर, शुक्रवार 🕤 वेळ सकाळी ९:३० वा. पासून 📍 स्थळ कोकोरिको ब्रिज, भूगाव (सांडपाणी विसर्गाचे ठ...