माशी मारायला तलवार कशाला ?

 माशी मारायला तलवार कशाला ?

अशी गत पुणे महानगरपालिका ची झाली आहे. २०१८ मध्ये २ कोटी चे ११ टॉयलेट बसवले हीच एक हास्यास्पद गोष्ट होती. स्मार्ट नवा खाली नागरिकांचे मानवी हक्क  उल्लंघन करणे हा हेतू होता का?  अता ३ वर्ष होतील हे टॉयलेट बंद आहेत AAP चे कृणाल घारे, आरती कारंजावणे यांनी महाराष्ट्र मानव अधिकार आयोग मध्ये याचिका  दाखल केली. आता गडबडून प्रशासन काही टॉयलेट दुरुस्त करत आहे.  पुणे महानगरपालिके चे अधिकारी म्हणतात दार चोरीला गेले म्हणून टॉयलेट बंद ठेवले!!! हि नागरिकांची चेष्टl  नव्हे तर काय? मातबदार. आणि हुशार अधिकाऱ्यांकडून अशे उत्तर योग्य आहे का. 


चांद्रयान ३ ला लाजवणारे अशे तंत्रज्ञान ह्या टॉयलेट्स मध्ये आहेत  असा वाव आणला जातोय आणि आता अश्या अविश्वसनीय आणि चमत्कारी  सौचालयाला दुरुस्त करायला तज्ज्ञाची शोध मोहीम चालू आहे. २०१८ मध्ये बॅलन्स शीत वर आलेले हे अससेट डिप्रेसिएशन बघता त्याची किंमत आता किती राहिली आणि त्या किमतीच्या तुलनेत आता मैनेटनेन्स वाले शोधणे हे अर्थी दृष्ट योग्य आहे का.  ह्याला म्हणतात  चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला. आणि आता दुरुस्त करून नागरिकांनी कॅशलेस च्या युगात खिश्यात सुट्टे  पैशे घेऊन फिरायचे का? खरा तर महानगरपालिके चे अधिकारी हुशार आहेत हे नक्कीच त्यांना कळेल. आता २ करोड रुपये नाल्यात गेले असे हि म्हणता येणार नाही  पण तरी छोटा मुह बडी बात, त्यांने जर प्लम्बर ला बोलावून हे स्मार्ट टॉयलेट मेकॅनिकल केले तर २ दिवसात हे काम होऊ शकते, ते हि कुठला हि टेंडर ना काढता. नागरिकांची गैर सोय होणार नाही आणि बिचाऱ्या त्या टॉयलेट ला पण आपल्या अस्तित्वाची जाणीव होईल. महानगरपालिके ने माशी मारायला तलवार वापरू नये .

Comments

Popular Posts