भूगाव, भुकुम, बावधन परिसरातील सर्व ग्रामस्थ व संबंधित रहिवाशांच्या वतीने हे पत्र आपणास सादर करण्यात येत आहे.
रामनदीतील सांडपाणी विसर्ग रोखण्यासाठी आम्ही, नागरिक प्रतिनिधींनी, PMRDA सह प्रत्येक संबंधित प्राधिकरणाकडे सातत्याने, नम्रपणे आणि परिश्रमपूर्वक पाठपुरावा केला. दुर्दैवाने, प्रत्येक वेळी 'पाहू', 'करू' अशा संदिग्ध आश्वासनांशिवाय कोणतीही ठोस कृती झाली नाही.
गंभीर बाब:
मा. विभागीय आयुक्त (दि. ०४ एप्रिल २०२५) व मा. NGT (OA 52/2023) यांचे स्पष्ट निर्देश लागू असताना आणि आपल्या कार्यालयाकडून आदेश देऊनही, कामाची अंमलबजावणी झालेली नाही.
फक्त ३० मीटरचे सीवर कनेक्शन आजतागायत अपूर्ण आहे.
परिणामी, सुमारे ७०% सांडपाणी (१ MLD) थेट रामनदीत मिसळत आहे.
PMRDA कडून झालेल्या अक्षम्य विलंबामुळे या गंभीर परिस्थितीत शांततापूर्ण आंदोलन करण्याशिवाय नागरिकांना पर्याय राहिलेला नाही.
त्यानुसार, 'रामनदी सत्याग्रह — धरना आंदोलन' बाबत आपणास अधिकृत सूचना देण्यात येत आहे:
| 📅 दिनांक | २८ नोव्हेंबर, शुक्रवार |
| 🕤 वेळ | सकाळी ९:३० वा. पासून |
| 📍 स्थळ | कोकोरिको ब्रिज, भूगाव (सांडपाणी विसर्गाचे ठिकाण) |
आम्ही नागरिक थेट रामनदीत सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यात उभे राहून आंदोलन करणार आहोत.
ही परिस्थिती निर्माण होण्यास संपूर्ण जबाबदारी PMRDA ची राहील.
आम्ही खालील दोन मागण्या तातडीने पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त करतो:
प्रलंबित ३० मीटर सीवर कनेक्शनचे काम तत्काळ सुरू करावे. आंदोलनाच्या वेळीच हे काम सुरू झाल्यास, आंदोलन स्थगित केले जाईल.
अट मान्य झाल्यास: आंदोलन न करता PMRDA चे सार्वजनिक आभार समारंभ आयोजित केला जाईल. अन्यथा, आंदोलन ठरल्याप्रमाणे पुढे जाईल.
आपण नक्कीच सकारात्मक पाठिंबा द्याल, या अपेक्षेसह,
Comments
Post a Comment